Wednesday 21 January 2015

आईपण

आई आणि मुलं

                   जन्माच्या आधीपासून जोडलेलं नातं, किती तरी  बोलला गेलेला विषय… आज मी काय लिहाव यावर आणि काय बोलवे… सर्वाना वाटते आई  होणे म्हणजे परमानंदाची स्थिती… आईपण म्हणजे स्त्रीत्वाचे साफल्य…. तिची जबाबदारी… मुल असणे व नसणे हे तिच्या अस्तित्वाशी जोडलेलं…. पण हे आईपण एखाद्या स्त्रीला नको असू शकते किंवा कधी हवे आहे याचा निर्णय तिला घ्यायचा असेल तर …. आपला समाज , विचार , रूढी तिला खरच  देतात का हा हक्क  …?

                   का येते तिला दडपण आता मुल नको हे कबूल करताना….? किंवा मला नकोच मुल असे म्हणताना … सासर, माहेर हे सारे का नाही तिला निर्णय घेऊ देत… आपल्या शरीरात पोसणारा जीव, आपला अंश, जन्माला घालताना होणारा प्रचंड शारीरिक त्रास, नंतर मुल  मोठे करताना होणारी दमछाक हे सर्व बाईनेच निभवायचे असले तरी तिला हक्क नाही निर्णयाचा असे का ….? बहुतेक स्त्रिया मनातून आई व्हायला आतुर असतात…. पण तरीही आपले मुल कधी असावे या बद्दल त्यांची काही मते असतात. बहुतेक वेळेला हि मते विचारात घेतली जात नाहीत आणि तिला पटवून दिले जाते कि आता लगेच बाळासाठी प्रयत्न करणे किंवा लांबणीवर टाकणे हे खूप महत्वाचे आहे… वय, आर्थिक परिस्थिती, सामाजिक स्थिती या सर्वापेक्षा जास्त महत्वाचे आहे आईची मानसिकता , तिची तयारी, तिच्या इच्छा कारण हे शिवधनुष्य तिला पेलायचे आहे… खरच त्या वेळेला आई -वडील आणि बाल यांच्यातील नाते प्रेम घट्ट असेल जेंव्हा आई शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या आईपण पेलण्यासाठी तयार असेल…. आणि आता आपण सर्वांनी तिला तो हक्क दिला पाहिजे. 

                   मी माझ्या आजूबाजूला किती वेळा अशी परिस्थिती पाहिली आहे कि नवरा सासरचे लोक ठरवतात कि आता आपल्याला मुल हवे पण तिला विचारलेच जात नाही जिला हे सर्व करायचे आहे , माझे असे म्हणणे नक्कीच नाही कि फक्त आईच्या मताप्रमाणे ठराव्या सार्या गोष्टी…. पण तिचेही मत विचारात घेतले जावे इतकीच अपेक्षा आहे… आणि हे समाजाच्या साऱ्या स्तरातून व्हावे, मी खूप वाट पाहत आहे याची.



3 comments:

  1. चांगला मुद्दा मांडला आहेस प्राची. सगळीकडे असं होत नसेल पण असे होतच नाही असे नाहि. आपण आशावादी राहणे इतकेच करू शकतो असे सध्यापुरता वाटते.

    ReplyDelete
    Replies
    1. आभार अपर्णा,

      तुझ्यासारख्या एखाद्या फक्कड लेखिकेने कमेंट केली , खूप बर वाटल, खर आहे तुझे सगळीकडे असे नाही,

      सगळीकडे असे होऊ नये असेच मला वाटते.

      Delete